परिचय सम्मेलन, Registration Open from 1st May 2025

लोकमान्य नगर भगिनी मंडळ इन्दूर



लोकमान्य नगर भगिनी मंडळ

लोकमान्य नगर भगिनी मंडळ द्वारा आयोजित परिचय सम्मेलनाचे हे 37 वे वर्ष,भगिनी मंडळाची वेबसाईट 26 व्या परिचय सम्मेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिनांक 27 ऑक्टोबर 2013 ला लोकार्पण केली होती.

उद्यमेनही सिध्यंती कार्याणि हा उद्देश्य समोर ठेवून कार्यकारिणी नेहमी उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करते,
7 जानेवारी 1971 रोजी भगिनी मंडळाची स्थापना झाली. सुरवातीला मंडळाची सदस्य संख्या 18 होती ती सदस्य संख्या आज 666 झाली आहे. संस्थेच्या मानद सदस्य, सांसद व पूर्व लोकसभा अध्यक्ष पद्मभूषण श्रीमती सुमित्राताई महाजन आहेत.

  • वर्तमान आजीवन सदस्य संख्या 650
  • त्रेवार्षीक सदस्य संख्या 27
  • वार्षीक सदस्य संख्या 52

वर्ष 1995 मध्ये संस्था रजिस्टर्ड झाली. मंडळाचा वाढता व्याप पाहून लोकमान्य गृह निर्माण सोसायटी ने मंडळाला स्वतःचे भवन निर्माण करण्या साठी जागा दिली. संस्थेने स्वतःची गंगाजळी, सदस्यांनी दिलेले अनुदान व थोडे फार कर्ज घेऊन स्वतःची वास्तू उभारली आहे. वास्तू चे उद्घाटन स्वर्गीय श्रीमती सुषमा स्वराज ह्यांच्या हस्ते झाले.

मंडळाच्या नियमित होणाऱ्या उपक्रमा मध्ये वाचनालय, योगवर्ग, वसंतोत्सव - मकर संक्रांति -तिळगुळ समारंभ ,वार्षिकोत्सव, रंगपंचमी, कोजागिरी, स्वास्थ्य शिवीर, संस्कार शिवीर, रांगोळी शिवीर,कुकिंग क्लासेस, वेगवेगळ्या संस्थांना व व्यक्तींना गरजे प्रमाणे आर्थिक सहयोग देणे विशेष म्हणजे दर वर्षी होणारे अखिल भारतीय स्तरावर आयोजित परिचय सम्मेलन.